अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी वसीम बुऱ्हाण यांच्या निवडीला एक वर्ष पूर्ण – कार्यकाळ ठरला प्रशंसनीय
मुंबई :

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी सोलापूरचे वसीम बुऱ्हाण यांच्या निवडीला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षांच्या कालावधीत त्यांनी केलेले कार्य समाजातील विविध स्तरातून कौतुकास पात्र ठरत आहे.

अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्या, तक्रारी आणि अन्याय याबाबत त्यांनी सातत्याने पुढाकार घेत तात्काळ दखल घेतली. अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सरकारी योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे.

त्यांच्या कार्यशैलीत तत्परता, पारदर्शकता आणि संवेदनशीलता दिसून येते. त्यामुळेच अल्पसंख्याक आयोगातील त्यांची नियुक्ती ही सार्थ आणि योग्य ठरल्याचे मत विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केले आहे.

वसीम बुऱ्हाण यांच्या या उल्लेखनीय कार्यकाळानंतर त्यांच्या भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





