अल्पसंख्याक आयोगाच्या हस्तक्षेपाने माढा येथील प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
सोलापूर:-

मानेगाव (ता. माढा, जि. सोलापूर) येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत सकल मुस्लिम समाजाने केलेल्या तक्रारीवर राज्य अल्पसंख्याक आयोगाने तातडीने कारवाई केली आहे.
अल्पसंख्यांक आयोग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. प्यारे खान साहेब (मंत्री दर्जा) व राज्य सदस्य वसीम बुऱ्हाण (वैधानिक दर्जा) यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांना सदर प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.
यासंदर्भात आयोगाचे सदस्य वसीम बुऱ्हाण व तक्रारदार यांचे शिष्टमंडळ दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर श्री. कुलकर्णी यांनी तात्काळ संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश माढा पोलीस स्टेशनचे पी.आय. यांना दिले.
या कारवाईमुळे तक्रारदार व समाजामध्ये समाधान व्यक्त होत असून, अल्पसंख्याक आयोगाने केलेल्या जलद कार्यवाहीचे स्वागत करण्यात येत आहे.





