आपला जिल्हा
पातूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर

पातूर (प्रतिनिधी) :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पातूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली तपासणी करून घेतली.

या उपक्रमाचे आयोजन सचिन समाधान ढोणे यांनी केले होते. तसेच वंदना ताई जगन्नाथ ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालय, पातूर यांनी विशेष योगदान दिले.

शिबिराच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. साजिद शेख, सचिन समाधान ढोणे, माधुरी सचिन ढोणे, राजू उगले, वैशाली निकम, प्रा . प्रशांत निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे अनेक गरजूंना मोफत नेत्र तपासणीची सुविधा मिळाली असून, उपस्थित मान्यवरांनी या सामाजिक कार्याचे कौतुक केले.





