डॉ. वंदनाताई जगन्नाथराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयचे यश,
पातूर (जि. अकोला) – विदर्भातील अग्रगण्य आयुर्वेद महाविद्यालयाचा अंतिम वर्ष बीएएमएस परीक्षेत १००% निकाल

पातूर:
विदर्भातील सर्वात प्रतिष्ठित आणि दीर्घ परंपरा असलेल्या डॉ. वंदनाताई जगन्नाथराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, पातूर यांनी यंदाच्या अंतिम वर्ष बीएएमएस परीक्षेत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा निकाल १००% लागून संपूर्ण विदर्भात पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.या निकालात विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे :
• प्रथम क्रमांक – दिव्या अग्रवाल (७४%)
• द्वितीय क्रमांक – प्रणव नांद्रे (७३%)
• तृतीय क्रमांक – क्षितिज उत्तुरवार (७२%)
• चतुर्थ क्रमांक – अभिषेक फंडात (७१%)
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार ट्रस्टचे चेअरमन आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या यशाचे श्रेयही आमदार डॉ. राहुल पाटील साहेबांच्या सततच्या प्रयत्नांना, मार्गदर्शनाला आणि महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कठोर परिश्रमांना दिले गेले.
यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. साजिद शेख, प्राचार्य डॉ. जयश्री काटोले, उपप्राचार्य डॉ. अभय भूसकडे उपस्थित होते.
महाविद्यालय गेली अनेक वर्षे विदर्भातील सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्प दरात उत्कृष्ट व शास्त्रोक्त आयुर्वेद उपचार उपलब्ध करून देत आहे.
येथे गरीब व होतकरू रुग्णांना सतत उपचाराचा लाभ मिळत आला असून, पुढेही ही सेवा अखंडपणे सुरू राहील असे आश्वासन आमदार डॉ. राहुल पाटील साहेबांनी दिले.
हॉस्पिटल व महाविद्यालयाचा लाभ परिसरातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.





