ताज्या घडामोडी

सोयगाव तालुक्यात तीन गटांसाठी २२ तर सहा गणांसाठी ४७ उमेदवारी अर्ज दाखल

सोयगाव दि.२१ (प्रतिनिधी) तालुक्यातील तीन गट आणि सहा गणांसाठी बुधवार( दि.२१) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ६९ उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश सिनगारे यांनी दिली
दरम्यान आमखेडा गटासाठी चार तर गोंदेगाव गटासाठी दहा आणि फरदापुर गटासाठी आठ असे २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून पंचायत समितीच्या सावळदबारा गणांसाठी १२, फरदापुर-६,आमखेडा-६,निंबायती-८,गोंदेगाव-५,आणि बनोटी-१० असे एकूण ४७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे यामध्ये आमखेडा गटात भाजप कडून पुष्पा काळे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले असून शिंदेसेनेकडून मोनाली पवार,बसप कडून उर्मिला इंगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला फरदापुर गटात भाजप कडून माहीन इदरीस मुलतानी यांनी दोन तर नौसीन सलीमखान मुलतानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले सीमा जयप्रकाश चव्हाण यांनी ही भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर शिंदे सेनेकडून उमा धरमसिंग चव्हाण, प्रभावती दारासिंग राठोड यांनी अर्ज दाखल केले देवका बाई राठोड यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस कडून सपना राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर गोंदेगाव गटातून शिंदेंसेनेकडून पूजा वाघ,मनीषा पवार यांनी राष्ट्रवादी(अजित पवार) कडून समीना तडवी,उद्धव सेनेकडून सुनीताबाई चव्हाण, भाजप कडून सविता बागुल,मनीषाबाई पवार, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) कडून सुशीलाबाई सोनवणे, संगीता नवळे,यांनी तर लक्ष्मी बाई जाधव, सरला तातळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करतांना उमेदवारांना मतदार यादी वरील सत्यप्रत साठी ऐनवेळी धावपळ उडाली होती तर काहींना पक्षाचा बी फॉर्म मिळाला नव्हता सहा गणातून सावळदबारा गणातून भाजप कडून तीन, शिंदे सेनेकडून तीन,काँग्रेस कडून एक,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार एक,उद्धव सेनेकडून दोन आणि वंचित बहुजन एक आणि अपक्ष एक असे बारा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.फरदापुर गणातून शिंदेंसेना दोन, भाजप तीन,राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) एक असे अर्ज दाखल झाले आहे. आमखेडा गणातून भाजप दोन,शिंदेंसेना दोन, वंचित बहुजन एक आणि अपक्ष एक असे सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे निंबायती गणातून भाजप एक,राष्ट्रवादी(अजित पवार एक)शिंदे सेना एक,बसप एक,रायभान जाधव आघाडी एक,अपक्ष दोन आणि उद्धव सेना एक असे आठ अर्ज दाखल झाले आहे. गोंदेगाव गणातून शिंदे सेवा एक, उद्धव सेना एक, भाजप एक,राष्ट्रवादी (अजित पवार) एक,राष्ट्रवादी( शरद पवार) एक असे पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे बनोटी गणातून शिंदेंसेना एक,एम आय एम-१,उद्धव सेना-१,भाजप एक,वंचित बहुजन एक,अपक्ष पाच असे दहा अर्ज दाखल झाले आहे.
चौकट;-अत्यंत उत्कंठा लागलेल्या निंबायती गणातून अखेर सविता सोपान गव्हांडे यांना शिंदेंसेनेची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी निंबायती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia